गडचिरोली:-जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील मुलींनी कबड्डी स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्याच् नाव आज मोठं केलं आहे,आज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात त्यांचं कौतुक होत आहे आणि शुभेच्छाचा वर्षांव त्यांच्यावर करण्यात येत आहे.
“अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ” अंतर्गत 19 वर्षाखालील (मुली) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिरोंचा तालुक्यातील मुलींची निवड झाली आहे.ही अभिमानाची बाब गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे.तसेच त्यांची राज्यस्तरीय स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कबड्डी खेळाडू मुलींना आर्थिक अडचण निर्माण झाली होती,ही कबड्डी खेळाडू मुलींची अडचण कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहोचविली,त्यावेळी राजे साहेबांनी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 20 हजार रुपये आर्थिक मदत त्या कबड्डी खेळाडू मुलींना केली.पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संपूर्ण कबड्डी खेळाडू मुलींनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे नेहमीच आपल्या क्षेत्रातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करून, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचं नावलौकिक करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात आणि सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात आणि त्यांनी आज पर्यंत अनेक युवा वर्गाला सहकार्य केले आहे.
यावेळी सिरोंच्या तालुक्यातील राजे साहेबांचे कार्यकर्ते शंकर नरहरी, माधव कासर्ला, सीतापती गट्टू,रमेश मुंगीवार,राजेश संतोषपु,मुरली मारगोनी,शाम बेज्जनी, चंद्रय्या सदनपू, हरीश कोत्तवडला तसेच विद्यार्थिनीं व कबड्डी प्रशिक्षक मादेशी उपस्थित होते.