मागणी लवकरच पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
सिरोंचाः-सिरोंचा तहसील कार्यालया समोर गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन उपोषण सुरू होते.याची माहिती मिळताच ८ नोव्हेंबर रोजी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळास भेट दिली.
सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर, मेडाराम, आदीमुत्तापूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर, व अमरावती या गावातील शेतकऱ्यांचे शेतीचे लोडशेडिंग बंद करण्यात यावे या मागणीसाठी सिरोंचा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची माजी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन ही राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना दिले.आणि त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व लवकरच या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेल्या एक वर्षांपासून महावितरण कंपनीकडून नारायणपूर भागात भारनियमन प्रक्रिया सुरू आहे. दिवसातून केवळ ८ तास विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मेडाराम, नारायणपूर, आदीमुत्तापूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर, व अमरावती या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. या भागातील शेतकऱ्यांच्या धान,मिरची, कापूस इत्यादी पिकांची मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,
लोडशेडिंग बंद करून २४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी संबंधित विभागाला शेतकऱ्यांनी अनेकदा करूनही लोडशेडिंग प्रक्रिया बंद करण्यात आली नाही.
यामुळे मागणी पुर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. परंतु माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपात जावून शेतकऱ्यांना तुमच्या मागण्या मी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी स्वतः भेट घेऊन पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांचे सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आश्वासन दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले ह्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना निंबु पाणी पाजून हे आंदोलन संपविले.
यावेळी जितेंद्र शिकतोळे तहसीलदार सिरोंचा यांनी सुद्धा परिश्रम घेतला व सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी व स्थानिकांची तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.