राजुरा_(चंद्रपूर ) तरुण पिढी काळानुसार व्यक्त होत आहे, अशा पिढीचं खुल्या दिलाने स्वागत केलं पाहिजे. श्वेता नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. स्त्रियांनी मोठ्या संख्येने लेखनाच्या माध्यमातून आपले जगणे मांडले पाहिजे, असे मत, डॉ. पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केले.
सप्तरंग प्रकाशन राजुरा च्या वतीने मनोरंजन सभागृह, धोपटाळा येथे
कवयित्री श्वेता चंदनकर यांच्या
मला कविता व्हायचंय_ ह्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण संपन्न झाले. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. पद्मरेखा धनकर बोलत होत्या
यावेळी भाष्यकार ऍड.जयंत साळवे व दुसरे भाष्यकारनरेशकुमार बोरीकर,प्रकाशक मनोज बोबडे,सुधीर चंदनकर,गीता चंदनकर उपस्थित होते. कवी डॉ. किशोर कवठे यांनी प्रास्ताविक स्वरूपात सप्तरंग संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. लोकार्पण सोहळ्यानंतर कवी किशोर मुगल,यांच्या अध्यक्षतेखाली, कवी रत्नाकर चटप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिभावंतांचे कविसंमेलन संपन्न झाले. यात एकूण ५६ कवींनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना जुनघरे, प्रवीण तुरानकर यांनी केले तर मधुकर डांगे यांनी आभार मानले.यावेळी सामाजिक जाणिवेच्या कवितांनी उपस्थित रसिक भारावून गेले.