कारंजा (घाडगे) / वर्धा – राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अभीजित फाळके पाटील यांच्या द्वारे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश अभियान व कार्यकर्ता मेळावा स्थानिक चरडे मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख, प्रमुख पाहुणे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ ताकसाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थिति मधे पार पडला.
यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव शिवराज शिंदे, राष्ट्रवादी वक्ता सेल जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप वानखेडे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे, युवक विधानसभा अध्यक्ष वृषभ निस्ताने, तालुका अध्यक्ष प्रशांत घोडमारे, तालुका महिलाध्यक्ष पुष्पाताई गोहते आणि राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष मोहन किनकर यांची प्रामुख्याने उपस्थिति होती. राष्ट्रवादी पक्ष अभिजीत फाळके यांच्या नेतृत्वात आर्वी-आष्टी-कारंजा या विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा नव्याने उभा राहील आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे वक्तव्य कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश देशमुख यांनी पक्ष प्रवेश अभियान व कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्घाटना प्रसंगी केले. या विधानसभा क्षेत्रात अभिजीत फाळके यांनी खितपत पडलेल्या राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देत प्रचंड मोठा असा कार्यकर्ता मेळावा घडवून आणून आणि अनेक तरुणांनां पक्षात प्रवेश देत पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करुण दिली असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजाभाऊ ताकसाळे यांनी मांडले. आपण सर्व हेवेदावे बाजूला सारत एकदिलाने राष्ट्रवादी पक्षाला जिल्ह्यात मजबूत करण्याकरिता काम करूया असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी अध्यक्षीय भाषण करतांना केले. यावेळी मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सचिव शिवराज शिंदे, राष्ट्रवादी वक्ता सेल जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून, सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप वानखेडे आणि विधानसभा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे यांनी सुद्धा कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत पक्षाची ध्येय धोरण समजावून सांगितली. यावेळी पक्षप्रवेश अभियाना अंतर्गत अभिजीत फाळके पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार संघातील जवळपास ५० महिला-पुरुष व तरुणांनी पाहुण्याच्या उपस्थितित राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कार्यक्रमाचे आयोजक अभिजीत फाळके पाटील यांनी करत पक्ष वाढीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव काम करणार असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण काटकर व पंकज मानेकर आणि आभार प्रदर्शन अनीस मुल्ला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन पाटील, प्रा. अरुण फाळके, स्वप्नील वराडे, सुनील ढोले, कुसुमताई गजभिये, पुष्पाताई गोहते, राजुभाऊ पालीवाल, प्रवीण मुत्तेवार, देवेंद्र पालिवाल, मोरेश्वर सवई, मुख्तार शेख, सुनील इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, विनायक वानखडे, राजेश भांडवलकर, विकास नासरे, दिलीप ठाकरे, अशोक पठाडे, जितेंद्र गाडगे, नरेंद्र मानकर, प्रशांत भिगारे, विनायक नांदने, प्रफुल्ल थोटे, शैलेश रमधम, विशाल अग्रवाल, स्वप्नील अग्रवाल, बाबूजी तिवारी, नत्थुजी देशभ्रतार, विनायक कोठे, रमेश चाफले, मोरेश्वर झामरे, अरुण गुडधे, सुरेश उघडे, राजेश्वर झामरे, दिलीप तायवाड़े, घनश्याम गुळघाने, सुधाकर ताथोड, अनिल इंगळे, मिलिंद देशभ्रतार, सुभाष शेंद्रे, विजय खवशी, रफीक बाबा, सारंग चौधरी, भूषण कडु, समीर बागडे, सचिन पांधरे, नयन गजभिये इत्यादिंनी प्रयत्न केला.