गडचिरोली : युवक-युवतींना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात जम्बो कार्यकारिणी तयार केली असून दक्षिण भागातही कार्यकारिणी तयार झाल्याने अहेरी विधानसभेत सुद्धा काँग्रेस पक्षाला उभारी मिळणार असल्याचे आशावाद महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड.कविता मोहरकर यांनी व्यक्त केले.त्या १ नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ निसार हकीम,किसान काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष नामदेव आत्राम,अनुसूचित जमाती सेल चे अध्यक्ष मधुकर सडमेक,अल्पसंख्यांक चे अध्यक्ष हनिफ शेख,महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सपना नैताम,सचिव वंदना सिडाम,उपाध्यक्ष ज्योती मडावी,रज्जाक पठाण,राघोबा गौरकर,गणेश उपगनलावार आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,मार्च महिन्यात जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यावर संपूर्ण जिल्ह्यातील बाराही तालुक्यात कार्यकारिणी तयार करून मोठी फळी उभी केली असून सध्या दक्षिण भागातील अहेरी विधानसभेचा दौरा करत विविध तालुक्यात कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेऊन समस्या जाणून घेत आहे.या दरम्यान एटापल्ली,अहेरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत पक्ष वाढविण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.एवढेच नव्हेतर पुढे गडचिरोली कडे जाताना मुलचेरा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील दुर्गम गावांना भेटी देत नागरिकांची समस्या जाणून घेतानाच आश्रम शाळांना भेट दिल्याचे सांगितले.
तर भविष्यात सक्षम संघटन तयार करून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देतानाच त्यांनी बूथ लीडर तयार करणे,सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सिडविणे,कार्यकारिणीत फेरबदल करणे,स्वयंरोजगार करणाऱ्याना बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे ग्वाही दिली.तर दर तीन महिन्यांनी प्रत्येक तालुक्याचा दौरा करत तालुका पातळीवरील कामकाजाचा आढावा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुरुषांची मक्तेदारी कमी करणार
राजकारणात महिलांना केवळ पद देऊन पुरुषांचा मागे बसविण्याचे काम केले जाते.मात्र,हे आता कुठेतरी कमी करून युवतींना आणि महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी तयार करून जिल्ह्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे काम केल्यास आपोआप राजकारणातील पुरुषांची मक्तेदारी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अहेरी विधानसभा स्वबळावर लढणार
अहेरी विधानसभा पूर्वी काँग्रेसचा गड होता.काही कारणास्तव काँग्रेसचे कार्यकर्ते इकडेतिकडे झाले असलेतरी आजही बरेच कार्यकर्ते सक्रिय आहेत.परत एकदा पक्ष बळकट करून अहेरी विधानसभा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.एवढेच नव्हेतर कुठलेही आयात उमदेवार देणार नसून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेला उमेदवार निवडणुकीत उभा राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.