आनंद दहागावकर/गडचिरोली
अहेरी :- अहेरी इस्टेटचा 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव विजयादशमीला अहेरी इस्टेटचे सहावे राजे श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा, छत्तीसगड राज्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवित सदर ऐतिहासिक उत्सव डोळ्यांत साठवून घेतला.
दसऱ्याच्या दिवशी अहेरी इस्टेटच्या परंपरेप्रमाणे सकाळी साईबाबा पालखी अहेरी राजनगरीचा मुख्य मार्गाने राजेंचा उपस्थितीत काढण्यात आली. सायंकाळी ऐतिहासिक पालखीत विराजमान होऊन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी सीमोल्लंघन करीत गडअहेरी येथे शमीचा वृक्षांचे पूजन तथा गडी मातेचे पूजन केले. त्यानंतर पालखी राजमहालात आणण्यात
आली. यावेळी अहेरी राजपरिवाराचे सर्व सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राजनगरीतील राजेंच्या या ऐतिहासिक महोत्सवाला जिल्ह्यासह शेजारच्या
राज्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान दसरा महोत्सवाच्या रंगतदार सोहळ्याचा त्यांनीही मनमुराद आनंद लुटला.
■अहेरी विधानसभेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण ?
राजे श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम
दसरा महोत्सवात जनसागराला संबोधित करतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. दसरा ही आपली ऐतिहासिक संस्कृती गेल्या 150 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. समोरही शेकडो वर्षे चालू राहील.या दसरा महोत्सवाचे महत्त्व कमी व्हावे यासाठी काही लोक अनेक प्रयत्न करीत आहेत, मात्र ते यात कदापी यशस्वी होणार नाहीत.सद्या आपल्या क्षेत्रातील रस्त्यांची दैनावस्था आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. अहेरी विधानसभा क्षेत्राची मागील 4 वर्षांत प्रचंड दुरावस्था झाली आहे.या परिस्थितीला जबाबदार कोण? याचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे ते म्हणाले.