गोंडपिपरी(सुरज माडुरवार) : मागील वर्षी कुलथा रेती घाटाचा लिलाव झाला होता.लिलावाचा कालावधी देखील संपला.मात्र अजूनही त्या रेतिघाटावर रेती तस्करांचा सुळसुळाट सुरू आहे.
घाटावरील लिलावधारकाचे अनेक रेती वाहतूक परवाने शिल्लक असून शासनाकडे जप्त आहे.अनेक घाटावरील रेती साठा मात्र संपला आहे.शिल्लक रेती परवाना असल्याने शासनाला वाढीव मुदतीसाठी मागणी केली असून अवैध रेतीसाठा जमा करणे सुरू आहे.परिसरातील ३० ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेतीचे उतखणन रोज सुरू आहे.कुलथा घाटाच्या व तालुक्यातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असून जिल्ह्यातील रेतीतस्कर सक्रिय झालेले दिसत आहे.लिलाव कालावधी संपल्यावर देखील घाटाला पोखरून शेकडो ब्रास रेतीसाठा जमा करण्यात येत आहे.रोज ३० ट्रॅक्टर घाटावर चालत असून प्रशासनाला कुठलीही माहिती नसल्याने प्रशासनाची मिलिभगत आहे का अशी चर्चा नागरिकांत असून जमा रेतीसाठ्याचे मोजपाप करून रेती जप्त करून घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून घ्यावे.सोबतच रेती तस्करी रोखण्यासाठी लिलाव झालेल्या मुदत संपलेल्या घाटचालकांना वाढीव मुदत न देण्याची मागणी होत आहे.