नागपूर :- भारताचे प्रथम कृषीमंत्री व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधुन कृषी महाविद्यालय नागपुर व ऍग्रो – व्हेट ऍग्रो इंजि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५ सप्टेंबरला व्ही. टी आय सभागृह नागपूर येथे सायंकाळी ४ वाजता आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितिजन्य कार्यामुळे व जीवनशैलीमुळे आजार संबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या भेडसावत आहे. हृदयविकारा सारखे आजार अगदी तरुण वयामध्ये वाढत चालले आहेत. आजार सुरु होण्याच्या आधी किंवा आजार उद्भवल्यानंतर जीवन शैलीत बदल केल्याने तसेच वैद्यकीय उपचार केल्याने गंभीर आजारापासून आपण बचाव करू शकतो. ही बाब विचारात घेऊन आज दिनांक ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्ताने प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्यांमध्ये सृजनता येण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मार्गदर्शन शिबिरात डॉ प्रशांत जगताप – कोर्डियोलोजिस्ट, विवेक हॉस्पिटल, नागपुर,डॉ प्रशांत रहाटे – सर्जन, सेव्हन स्टार हॉस्पिटल, नागपुर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ प्रकाश कडू असोसिएट डीन – कॉलेज ऑफ एग्रिकल्चर, नागपुर, दिलीप मोहितकर अध्यक्ष ,ऍग्रो व्हेट ऍग्रो इंजि मित्र परिवार यांनी केले आहे .