वर्धा :-शहरालगतच्या पिपरी मेघे येथील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेडा लावण्याकरीता मंदिराच्या कळसावर चढलेल्या तिघांचा वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाचवेळी मृत्यू झाला. गावातील तीन भाविकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. वीजेचा धक्का लागल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याचीही घटना ३० ऑगस्ट ला सकाळी शहरालगतच्या पिपरी(मेघे) येथे घडली. या घटनेत एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास वर्धा पोलीस करत आहे .