भद्रावती :- भद्रावती येथे विवेकानंद महाविद्यालय भद्रावती तथा द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोज रविवार ला विवेकानंद महाविद्यालय भद्रावती च्या मैदानावर करण्यात आले. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती तालुक्याचे तहसीलदार अनिकेत सोनवणे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भद्रावती चे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संगीता आर. बांबोडे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, नगरसेवक राहुल चौधरी, राजेश मत्ते अध्यक्ष विवेकानंदा स्पोर्टिंग क्लब भद्रावती. संतोष निंबाळकर सचिव द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भद्रावती हे प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अमोल तुळजेवार पोलीस उपनिरीक्षक भद्रावती यांनी खेळामुळे देशाचे नावलौकिक होते आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार अनिकेत सोनवणे खेळाचे महत्व या विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० संघ उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कवटी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन अमित आस्वले यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवराज भारती यांनी केली या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ १० संघांनी सहभाग घेतला आणि स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली या स्पर्धेच्या आयोजनासाठी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव उमाटे यांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी द्रोणाचार्य क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, विवेकानंद ट्रॅक स्टार क्लब भद्रावती आणि विवेकानंद स्पोर्टिंग क्लब भद्रावती यांचे सर्व पदाधिकारी आणि खेळाडू यांनी मेहनत घेतली. भूषण बावणे एडवोकेट अशोक वाघमारे, दीपक कावटे, आशिष आसुटकर, अतुल वाघमारे, विलास लोणारे, तृणाल उंबरकर, प्रतीक देवतळे, एकता खंडाळकर, श्रद्धा मंगीळवार, सावन आत्राम, प्रशांत बगुडवार, समीर मेश्राम, आतिष मेश्राम, रोशन इस्टाम, भुषण इस्टाम,दिनेश चिंचोलकर, नागेश रामटेके, स्वप्नील येरमे, हार्दिक आत्राम, शादाब शेख, प्रतीक वरखेडे, अतिश मेश्राम, कुंदन नांदे, दिनेश बोंडे यांनी सहकार्य केले.