गडचिरोली :- गडचिरोली जिल्हातील आलापल्ली वन विभागातील आलापल्ली वनपरिक्षेत्रातील आलापल्ली राउंड मधील नेंडर बीट खंड क्र. 12 मध्ये दोन पट्टेदार वाघांच्या लढाईत एका लहान वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली .
, मृत पावलेल्या पट्टेदार वाघाचे अंदाजे वय दीड वर्ष असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे. आलापल्ली जंगल परिसरात वाघांचे अस्तित्व असून मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभागा तर्फे या प्रकरणाचा पण गांभीर्याने तपास करीत आहे, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. जंगल परिसरात दोन वाघांची लढाई ही काही नावीन्यपूर्ण गोष्ट नाही. प्रस्थापित परिक्षेत्रात आदीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. ते दोन्ही वाघ आमने- सामने येतात दोघांमध्ये लढाई होणे हे स्वाभाविक आहे. ही लढाई इतकी भीषण असते की यामध्ये दोन्ही वाघांना जर बरोबरीच्या ताकतीचे असले तर अनेकदा गंभीर जखमी होतात तर अनेकदा दुसरा वाघ जर ताकतीने कमी असेल तर एकाचा जीव जाणे निश्चित असते. परंतु मागील महिन्यातील मोसम शिकार प्रकरणामुळे वनविभाग याचा बारकाईने तपास करूनच वरिष्ठ अधिकारी आपली पुढील प्रतिक्रिया देतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे .