भंडारा:प्रचंड उत्साह आणि विविध कला अविष्कारांचा साक्षात्कार अशा उत्साही वातावरणात खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत युवा व महिला सांस्कृतिक महोत्सव लाखांदूर येथे पार पडला. शुभांगी मेंढे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अवचित्य साधून वैनगंगा पांगोली खासदार संस्कृतिक महोत्सव भंडारा गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. युवा आणि महिलांसाठी विविध स्पर्धा या महोत्सव दरम्यान घेतल्या जात आहे. तालुका आणि नंतर लोकसभा स्तरावर स्पर्धा घेतल्या जाणाऱ्या आकर्षक रोख बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह दिली जात आहे. साकोली आणि लाखनी येथील महोत्सव वाटल्या नंतर 22 रोजी लाखांदूर तालुक्याचा युवा व महिला महोत्सव आशीर्वाद मंगल कार्यालय येथे घेतला गेला. याचे उद्घाटन शुभांगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंता इचिलवार, माधुरी नखाते, नरेश खरकाटे, प्रल्हाद देशमुख, नूतन कांबळे, नीलम हुमणे, प्रियांक बोरकर, तुळशीदास बुराडे, मेजवान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा जिंकण्यासाठी असली तरी यातून बरेच काही शिकता येते. एक जिंकला तर दुसरा हरणार आहे मात्र पराभवाने खचून न जाता त्याकडे सकारात्मक भावनेने पहा. सांस्कृतिक महोत्सवाचे व्यासपीठ स्वतःतील सुप्त गुणांना वाट मोकळी करून देण्याचे एक निमित्त असल्याचे यावेळी मार्गदर्शन करताना शुभांगी मेंढे यांनी सांगितले. दरम्यान स्पर्धा सुरू असताना खासदार सुनील मेंढे यांनी महोत्सवाला भेट दिली. स्पर्धेत सहभागी कलावंतांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत युवक आणि महिलांचे अनेक संघ सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य सादर केले गेले. यावेळी विजेत्यांना बक्षीसही देण्यात आले.
*24 ऑगस्टला पवनी आणि लाखनी तालुक्याचा सांस्कृतिक महोत्सव*
खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत 24 ऑगस्ट रोजी पवनी तालुक्यातील युवा आणि महिला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन लक्ष्मी रमा सभागृह लाखांदूर तर लाखनी तालुक्यातील युवा व महिला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन स्वागत सभागृह लाखनी येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात करण्यात आले आहे. युवा आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.