वरोरा :-मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे . मैदानी खेळांमुळे शारीरिक व्यायामा सोबत. बौध्दिक विकासाला ही हातभार लागतो .असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती वरोऱ्याचे सभापती राजू चिकटे यांनी मत व्यक्त केले .
मातृभूमी क्रीडा मंडळ एकर्जूनाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे सभापती राजेंद्र चिकटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते . यावेळी एकर्जूना येथील प्रथम नागरिक सरपंच उज्वला थेरे ,अल्का पचारे, रामा भोयर ,राजू चिंचोळकर यांच्यासह एकर्जूना गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनीय भाषणात पुढे बोलतांना ते म्हणाले की, सध्या प्रत्येक व्यक्तीला वेळ मिळत नसल्याची सबब पुढे करीत व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा परिणाम शरीरावर होवून. शरीर आजारांचे माहेर बनून राहिले आहे .कधी ऐकले नव्हते असे आजार युवकांना ही होत आहे. या आजारापासून मुक्त राहण्याकरिता व चांगले आरोग्यदायी जीवन जगण्याकरिता व्यायामाची गरज आहे. त्यातच युवकांनी व्यायामाला प्राधान्य देऊन एखाद्या खेळात नैपुण्य प्राप्त करून आपले करिअर घडवावे असे आव्हान राजू चिकटे यांनी केले.
या स्पर्धेमध्ये एकूण 22 संघांनी सहभाग नोंदविला आहे. सामने दिवसा व रात्री विद्युत प्रकाशझोतात खेळविले जाणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मातृभूमी क्रिडा मंडळ एकर्जूना चे अध्यक्ष साईनाथ साळवे, उपाध्यक्ष स्वप्निल कुडाळकर ,कोषाध्यक्ष समीर पुसदेकर ,क्रीडा प्रमुख विकास धोटे ,भूषण सोनटक्के ,गणेश मिलमीले ,प्रशांत साळवे, शुभम चौधरी आदी कार्यकर्ते कार्यरत आहे.