वणी:- महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विजय संकल्प पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा महासचिव भाजपा ओबीसी तथा प्रचारक गुरूदेव सेवा मंडळ वरोराचे डॉ. अंकुश आगलावे यांनी शेतकरी भवन वणी येथे जनसंवाद यात्रा दरम्यान केले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांचा यवतमाळ जिल्हयात दौरा कार्यक्रम आयोजित होता यावेळी वणी येथे संपर्क से समर्थन, जनसंवाद यात्रा, पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. आगलावे, श्री. गुरूदेव सेवा मंडळ व भाजपा विधानसभा वरोराच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोझरी येथून आणलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा व पंढरपूर येथून आणलेले विठ्ठल रूख्माई ची मुर्ती, ग्रामगीता व भगवी टोपी देवून सत्कार करण्यात आला.
गुरूदेव सेवा मंडळाच्या समर्थन व पुढाकाराने भाजपाचा विजय खेचुन आणू असे डॉ. आगालवे यांनी सांगितले. वणी शहरात तेराशे लोकांना संपर्क से समर्थनचे पत्रक वाटण्यात आले. प्रत्येक विधानसभेत साठ हजार घरापर्यंत विजय संकल्प पोहचविण्यात संकल्प यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्ता व पदाधिकारी यांना दिला.
यावेळी मंचावर हंसराज अहीर, पुर्व गृहराज्यमंत्री भारत सरकार तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्ली, भुपेंद्र कोठेकर, तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, शंकर लालसरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमात वरोरा, वणी तथा चंद्रपूर व यवतमाळ लोकसभा क्षेत्राचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तारेंद्र बोडे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी केले होते.