तात्काळ मजुरी द्या अन्यथा कंपनीचे ट्रक विकणार असल्याचा दिला इशारा
वरोरा (गणेश उराडे):-वरोरा- शेगाव- चिमूर रोड चे काम गेल्या ५ वर्षा पासून संथगतीने सुरू आहे.सदर कामाचे कंत्राट एस आर के कंपनीकडे आहे.अशा स्थितीत ५० किलोमीटर असलेल्या या रोड चे काम आता पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते परंतु कामाचा कालावधी लोटून देखील अद्याप काम अपूर्ण आहे.कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या पाच वर्षात कितीतरी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर कितीतरी नागरिकांना अपंगत्व आले.
या कंपनीत अनेक मजूर काम करत आहे गेल्या ३ महिन्यापासून मजुरांचे पगार कंपनीने दिले नाही. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे शेरखान पठाण यांना कामगारांनी सांगितले असता कंपनीत जाऊन दोन दिवसात तुम्ही कामगारांचे पगार त्यांच्या खात्यात पाठवा अशी तंबी एस आर के कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली परंतु दोन दिवसाचा कालावधी लोटूनही तेथील ट्रक ड्रायवर, कर्मचारी यांचे पगार कंपनीने जमा न केल्याने प्रहार आक्रमक झाली असून प्रहार सेवक शेरखान पठाण आज कंपनीत जाऊन कंपनीचे एकही अधिकारी कंपनीत उपस्थीत नसल्यामुळे प्रहार सेवक यांनी ट्रक ताब्यात घेऊन त्यांना फोन वरून तुम्ही दहा दिवसात जर मजुराचे पगार काढले नाही तर ट्रक विकून आम्ही मजुराचे पगार करू असे प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.