आजचे दिनविशेष – 20 ऑगस्ट 2023
दिनविशेष –
२००४ – भारताची विश्वविख्यात जलतरणपटू बुला चौधरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार येथे पाल्कच्या सामुद्रधुनीत ४० किलोमीटर अंतर पार करण्याचा पराक्रम केला. जगातील सात समुद्र पार करणारी ती पहिलीच महिला जलतरणपटू ठरली.
२००८ – भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमारने ब्रॉँझपदक पटकावले. खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ५६ वर्षांनी भारताला कुस्तीत पदक मिळाले.
२०१८ – महिला कुस्तीत पंचावन्न किलो वजनी गटात भारताच्या विनेश फोगटला सुवर्ण. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली महिला कुस्तीगीर ठरली. दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत दीपक कुमारला रौप्यपदक. नेमबाजीच्या ट्रॅप प्रकारात लक्ष्य शेरॉनलाही रौप्यपदक.