अहेरी : तालुक्यातील आवलमरी ग्रामपंचायत अतंर्गत येते लंकाचेन येथे माजी जि प अजय कंकडालवार यांच्याहस्ते विविध किकास कामांचे भूमपूजन करण्यात आले.
शंकर पोच्या दुर्गे यांच्या घरापासून चंदृ भगवान कुळमेथे यांच्या घरापर्यंत,बुधय्या करपेत ते बापू करपेत यांच्या घरापर्यंत तसेच शामराव कुळमेथे ते मदनय्या कुमराम यांच्या घरापर्यंत असे तीन सिमेंट कँक्रेट रस्ता प्रत्येकी 195 मी. 20 लक्ष असे एकूण 60 लक्ष रुपयाचे काम मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे.
मागील अनेक वर्षापासून या गावात मुख्य रस्ते नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर सर्व ठिकाणी चिखल साचल्यामुळे नागरिकांना त्या चिखलातूनच चालल्या शिवाय पर्याय नव्हता. मागील अनेक दिवसापासून सिमेंट रस्ता बांधकाम व्हावा यासाठी येथील नागरिकांनी अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी रेटून धरली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाले असून नुकतेच त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नारपंचयातचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सरपंच सौ.सुनंदा कोडपे,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,माजी सरपंच मारोती मडावी,ग्रा.प.सदस्य विमला छटारे ,ग्रा.प.सदस्य कमलाबाई आत्राम,नामदेव मडावी,नानाजी मुरमाळे,बाबुराव बट्टी,पोचम मडावी,वैकंना कोडपे,पोलीस पाटील मनोहर पांगळे, साबय्या कुळमेते,चंदु कुळमेते,रमेश सडाम,महेश पानेम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.