गडचिरोली:- येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर दहा दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलन मंडपाला खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या.
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत्त कार्यालय गडचिरोली समोर 9 ऑगस्ट पासून आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना निलंबित करा, मग चौकशी करा. या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी खासदार अशोक नेते यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. या संबंधित योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडून निकाली काढण्याचा प्रयत्न राहील व निश्चितच योग्य न्याय मिळेल असे त्यांनी आश्वासित केले.
यावेळी मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार शंकर ढोलगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे व आंदोलन करते उपस्थित होते.