वरोरा :- राज वारसा प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट सुभेदार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून २० ऑगस्ट रोजी ही निबंध स्पर्धा होणार आहे.वरोरा येथील अनिल वरखडे हे चित्रपट निर्माते आहे . येथील हिरालाल लोया विद्यालयाच्या सभागृहात या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड युद्ध या विषयावर आयोजित निबंध स्पर्धा २० ऑगस्ट रोजी शिवशंभो बहुउद्देशिय सामाजिक संस्था वरोरा, शंभूराजे मर्दानी खेळ मंच, पुणे आणि विवेकानंद फाऊंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिके दिली जाणार आहे. यात प्रथम क्रमांक – शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र,
तृतीय क्रमांक – शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र आणि
सुभेदार चित्रपटाचे ४ टिकीट यांचा समावेश आहे. रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ यावेळी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी जितेश कायरकर यांच्या ८६०००५७३७२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.