गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी पोलिसांनी आज दि.(१८)शुक्रवारी भंगाराम तळोधी-दरूर मार्गावर महाराष्ट्रातून अवैधरित्या जनावरांची तस्करी करणाऱ्या दोन पिकअप वाहनांना जप्त करून सहा आरोपींना अटक करत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.मधु सानप देवय्या,राजन्ना मलय्या कोट्टे,अंजी,राजन्ना कोट्टे,परमेश मलय्या गोरे,रामन्ना नरसय्या मुत्ते,राजय्या राजालिंगु गोल्ला सर्व रा.जिल्हा मंचेरियाल राज्य तेलंगणा येथील अटकेतील आरोपींचे नावे आहेत.ठाणेदार जीवन राजगुरू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ठाणेदार राजगुरू,पोशि प्रेम चव्हाण,पोशि तिरुपती गोडसे यांनी दोन वाहनांचा पाठलाग करून वाहन थांबवून तपासणी केली असता जनावरांची अवैध निर्दयीपणे वाहतूक करताना आढळले चौकशी करून महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार आरोपींवर गोंडपिपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.