चंद्रपूर:-गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नातुन जनसुविधा अंतर्गत सावली तालुक्यातील सामदा बूज, सोनापुर, व्याहाड बूज, घोडेवाही येथील जनसुविधा अंतर्गत मंजूर कामांचे भूमपूजन करण्यात आले.
खा.अशोक नेते यांनी विशेष प्रयत्न करून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांची निधी खेचून आणले.नुकतेच सावली तालुक्यातील विविध गावात विकास कामांचे भूमपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सामदा बुज,व्याहाड बुज.व कोंडेखल येथे खासदार अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कमिटीने जंगी स्वागत केले.याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गावांतील समस्या, प्रश्नं,पिण्याच्या पाण्याचे समस्या, शेतकऱ्यांचे विषय जाणुन घेत, शेतकऱ्यांविषयी संवेदनशील विचार व्यक्त करत नहराच्या पाईपलाईन संबंधित तात्काळ सिंचाई विभागाचे अधिकारी व गोसीखुर्द अधिकारी यांच्या समेत बैठक घेण्या संबंधित सुचना केल्या व लवकरात लवकर या संबंधि बैठक आयोजित केली जाईल. सदर बैठकिला सिंचाई विभागाचे अधिकारी, तहसीलदार,बिडिओ, गोसीखुर्द अधिकारी,कृषि विभाग अधिकारी, ग्रामिण रुग्णालय अधिकारी,विद्युत महावितरण अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, सावलीचे बिडीओ वासनिक,नायब तहसीलदार मंथनवार, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार,विस्तार अधिकारी देवतळे, कृषि अधिकारी अश्विनी घोडसे,कृ.उ.बा.समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार,जेष्ठ नेते अरुण पाल, माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, भाजपाचे युवा सामाजिक नेते किशोर वाकुडकर,सामदा चे सरपंच शुभांगी मडावी,माजी सरपंच देवानंद पाल, व्याहाड बुज सरपंच्या कविता बोलीवार, सोनापुरचे सरपंच्या जयश्री मडावी, उपसरपंच परशुराम भोयर,उपसरपंच मुकेश भुरसे, उपसरपंच नरेश बाबणवाडे उपसरपंच चेतन रामटेके ,ग्रा.प. सदस्य तथा खासदार महोदयांचे सहाय्यक दिवाकर गेडाम,सदस्या प्रणिता तोडेवार, ग्रा.प.सदस्य प्रकाश नागापुरे,सदस्य शरद मडावी, सदस्या उषा पोहनणकर, सुखदेव मोहुरले,सदस्य विशाल वाढणकर,अनुराग लेनगुरे, प्रविण पोहणकर, अमोल पिपरे,कुकडे महाराज, प्रशांत मडावी, डॉ. तोडेवार साहेब,दासरवार साहेब, ग्रामसेवक बांगडे मॅडम, तुळशीदास भुरसे, सुधाकर म्याकलवार,राजु गेडाम, कानू गेडाम,महादेव वाढई,साईनाथ संदोकर,देवराव गोहणे तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.