गडचिरोली:-जिमलगट्टा उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत समाविष्ट उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे भव्य कृषी व जनजागरण मेळाव्याचे आयोजन आज 18 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम व गडचिरोली पोलीस दल अंतर्गत उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली यांचे संयुक्त विद्यमानाने रेपणपल्ली येथे सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून मोलाचे मार्गदर्शन या भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याहस्ते या उप पोलीस स्टेशन अंतर्गत समाविष्ट गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतीची उपकरणे विविध साहित्य यांचा लाभ घेण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले आहे.