कार्यालयातून :गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी,नारंडा येथील दालमिया, उपरवाही येथील अंबुजा कंपनी कवराळा कोरपना तालुक्यातील स्टील कंपनी येथील होणाऱ्या वायू जल व ध्वनी प्रदूषणामुळे त्या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागत आहे. उद्योग कंपनीच्या परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून या सर्व उद्योग कंपनीचे काम सर्रास चालू आहे परंतु परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून या प्रदूषणाचा सामना करावा लागतो नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीची दखल घेत शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा.शिल्पा बोडखे यांनी प्रदूषित परिसराचा पाहणी दौरा करून तसेच तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांना होणाऱ्या समस्या व त्रास याविषयी माहिती घेतली असता तेथील नागरिकांनी गडचांदूर शहरांमध्ये सूर्योदय होताच नागरिकांना घर व घराच्या अंगणात तसेच घरातील साहित्य धुळीचा थर साफ करावा लागतो त्यामुळे त्यांच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होत आहे तसेच कंपनीच्या ध्वनी वायू व जल प्रदूषणामुळे मानव व पाळीव प्राण्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपनीची अमानत रक्कम जप्त केल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळ भासवत आहे परंतु नागरिकांचा त्यामुळे प्रश्न काही सुटत नाही कंपनीने प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेही प्रभावी कार्य हाती घेतलेले नाही.शहरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीने केला नाही कंपनीचे प्रदूषित पाणी वाहून जात असल्याने नाले वड्यांचे दूषित पाणी पिऊन अनेक जनावरे देखील आजारावर मृत्यूच्या दारात जावे लागत आहे कंपनीच्या चुनखडी उत्पन्न परिसरामध्ये राखीव जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे वन जमिनीवर अधिकृत अतिक्रमण करून उत्खननामुळे परिसरात धुळीचे कण वायू प्रदूषण यामुळे वैभव नष्ट होत आहे त्या पंचक्रोशीत पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांची उभे पीक नष्ट होते व प्राण्यांचे निवारे नष्ट झाल्यामुळे पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांचे अनेक वेळा अपघात घडून दुखापत घटना देखील घडल्या आहेत कंपनीकडून पर्यायी व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आली नाही त्यामुळे या भागातील प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीरतेने घेऊन वाढत्या प्रदूषणामुळे होणारे त्रास थांबवण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याकरिता तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रा. शिल्पा बोडखे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब यांना पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे.