गोंडपिपरी -(सुरज माडुरवार):- आज दि (२८) शुक्रवारी गोंडपिपरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली .पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण वाहून गेल्याची खळबळजनक घटना दुपारी एक वाजता दरम्यान घडली.आकसापूर – मोठी बेरडी मार्गावर असलेल्या नाल्यात कार वाहून गेली एक किलोमीटर अंतरावर ही कार बंधाऱ्याला अडकली असल्याने सापडली .पण कारचालक बेपत्ता आहे अमित गेडाम असे कार चालकाचे नाव आहे.चंद्रपूर येथे मिटिंग असल्याने गोंडपिपरी मार्गे ते निघाले.गेडाम हे पोंभुरणा तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्हणून कार्यरत होते गोंडपिपरीच्या शासकीय गोदामाचा त्यांच्याकडे प्रभार आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी कोठारीचे ठाणेदार गायकवाड,गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू,पोंभुरणाचे ठाणेदार मनोज गाथाडे व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले असून ती कार एका बंधाऱ्यालगत आढळली पोलीस विभाग गेडाम यांचा शोध घेत आहे