गडचिरोली: सर्वसामान्य नागरिकांना घटनेत अभिप्रेत असलेला न्याय कमी खर्चात आणि कमी वेळेत मिळणं आवश्यक आहे.असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. अहेरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती संजय मेहेरे, न्यायमूर्ती महेंद्र चांदवणी, गडचिरोली चे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल, अहेरीचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविशंकर बावनकर, जिल्हाधिकारी संजय मिणा, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे.येथील आदिवासी लोकांचा कठीण परिस्थितीत जीवन जगावे लागते.अश्यावेळी छोटे मोठे घटना होतात.मात्र,येथील आदिवासी पक्षकाराला न्यायासाठी बरेचदा वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.जिल्हा मुख्यालय गाठून दोन ते तीन दिवस मुक्काम केल्याशिवाय न्यायालयीन काम होत नाही. यापूर्वी या परिसरातील 60 टक्के खटले गडचिरोली येथे दाखल व्हायचे. अश्यावेळी अहेरी सारख्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणे हे या भागातील नागरिकांसाठी फायद्याचे ठरणार आहे. अहेरी उपविभागातील मुलचेरा, अहेरी, एटापल्ली भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यातील 725 गावातील पक्षकारांना न्याय मागण्यासाठी आणि न्यायालयाला न्याय देण्यासाठी सोयीस्कर झाला आहे. अहेरी येथे 3 एप्रिल 2015 रोजी दिवाणी न्यायालय सुरू करण्यात आले होते.अधिवक्ता संघाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयची मागणी केली .त्याचा पाठपुरावा केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दिली. विशेष म्हणजे त्यांचा आज वाढदिवस असून आदिवासीबहुल भागाला त्यांनी दिलेली ही खूप मोठी भेट असल्याचे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यायालय परिसरात न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आगमन होताच आदिवासी पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात नृत्य सादर करत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.तर अधिवक्ता संघाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. ठरल्यानुसार न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाचा उद्घाटन करण्यात आले.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी संवाद साधले.
त्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या आतील भागाची पाहणी केली.तर अहेरीचे नवनियुक्त सत्र न्यायाधीश रविशंकर बावनकर यांना त्यांच्या खुर्चीवर बसवून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महागाव रस्त्यावरील इंडियन फंक्शन हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व न्यायमूर्तींचे शॉल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
गडचिरोलीची जुनी ओळख पुसून काढणार:देवेन्द्र फडणवीस
इंडियन फंक्शन हॉल येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असून या जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि गोंडवाना विद्यापीठ विस्तारासाठी प्रयत्न सुरू आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात कनेक्टिव्हिटी साठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.भारतात कुठेच नाही असा लोहयुक्त दगड गडचिरोलीच्या माध्यमातून मिळत आहे. मोठमोठे उद्योगपती या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत असून जैवविविधता नैसर्गिक रचनेला कुठलाही धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. त्या अनुषंगाने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.त्यामुळे लवकरच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून असलेली जुनी ओळख पुसून गडचिरोलीला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.अत्यंत विपरीत परिस्थितीतही गडचिरोली पोलीस दल चांगली कामगिरी करीत असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाची त्यांनी स्तुती करतानाच नक्षल्यांना त्यांची विचारधारा सोडून संविधानावर विश्वास ठेवत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे त्यांनी आवाहन सुद्धा केले.
दोन दिवसांपासून पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलीस अधीक्षक निलोप्पल तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात मागील दोन दिवसापासून या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 22 जुलै रोजी प्राणहिता पोलीस उप मुख्यालय पासून तर अहेरी शहराला पोलिसांची छावणी निर्माण झाली होती. तब्बल पाच ते सहा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांच्या माध्यमातून बंदोबस्त लावली होती.तर परिसरात सी-60 पार्ट्या सुद्धा तैनात करण्यात आले.