गोंडपिपरी :- (सुरज माडुरवार) : अतिवृष्टिमूळे तालुक्यातील आक्सापूर आणि करंजी गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली.आक्सापूरातील दोन तलाव फुटले.करंजीत पूरपरिस्थितीमूळे शेकडो घरे पाण्याखाली आली.अन्नधान्याची नासधूस झाली.अनेक कुटूंबांना स्तलांतरित करण्यात आले.तलावाच्या वेस्टवेअरचे नाले फुटले.शेतीत जागोजागी भर पडले.दोनही गावातील
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गोंडपिपरी तालुक्यातही काही गावात अतिवृष्टिचा फटका बसला.यामूळे गोंडपिपरी तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.ते शनिवारी (दि.२२) नियोजन भवनात पूरपरिस्थितीवरील आढावा बैठकीत बोलत होते.
गोंडपिपरीतील तालुक्यातील आक्सापूर येथिल दोन तलाव फुटले.यामूळे परिसरात अतिवृष्टिजन्य पूरपरिस्थिती निर्माण झाली. रोवणी केलेले धान, व पऱ्हे पुरात वाहून गेले शेतात मातीचा थर जमा झाला.तसेच करंजी गावात अतिवृष्टिमूळे मोठी वाताहत झाली.यात शेकडो घरे पूराच्या पाण्याखाली आली.दोनही गावात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले.करंजी आणि आक्सापूर येथिल समस्येला घेऊन गावकऱ्यांनी शनिवारी (दि.२२) पालकमंत्री ना.सुधिर मुनगंटिवार यांची भेट घेतली.पुरग्रस्त शेतकऱ्यांचे आणि पडझड झालेल्या कुटूंबियांचे तातडीने पंचनामे करुन मदत द्यावी,असे निर्देश पालकमंत्री सुधिर मुनगंटिवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा शनिवारी नियोजन भवनातील बैठकीत पार पडला.यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी भाजपचे राजुरा विधानसभा अध्यक्ष देवराव भोंगळे,गोंडपिंपरी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक सातपुते यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुक्यात पूरपरिस्थितीमूळे उद्भवलेल्या समस्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जेष्ट कार्यकर्ते बळवंत पिपरे,गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
गणपत चौधरी(गुरुजी),आक्सापूरचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रजित गव्हारे,करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे आदींची उपस्थिती होती.