वरोरा : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहे. त्यामुळे निवडणुका लढण्यासाठी सर्व पक्षीय तयारीला लागले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना
कृषी बाजार समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी आज सोमवार दि २७ मार्च रोजी आयोजित बैठकीत जाहीर केले.शिवसेना कार्यालय वरोरा येथे झालेल्या या बैठकीत शिवसेना पदाधिकारी, सोसायटीअध्यक्ष,उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,उपसरपंच, सदस्य,शिवसैनिक,युवासैनक उपस्थित होते.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे ) कृषी बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवणार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा भगवा झेंडा फडकवणार असा निर्धार शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केला.
सदर आढावा बैठकीला शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठानी, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे, युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे, उपतालुका प्रमुख महेश देवतळे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे , उपतालुका प्रमुख अक्षय ताजने,उपतालुका प्रमुख अक्षय झिले, विभाग प्रमुख शंकर धानकी, सरपंच वंदना निब्रड, ग्रामपंचायत सदस्य अमोल काटकर, माजी सरपंच विठ्ठल जोगी, सरपंच बालाजी जिवतोडे, माजी सरपंच पुण्यवाण तुराणकर, सोसायटी सदस्य रवींद्र नांदे , उपसरपंच रमेश पावडे, सदस्य महादेव येडमे, सदस्य रघुनाथ खापणे,उपसरपंच प्रमोद तोडासे,सदस्य हर्षद निब्रड,सदस्य निलेश जिवतोडे, सोसायटी सदस्य माधव पेचे,सदस्य सुनंदा श्रीकृष्ण धाडसे,रामदास खंडाळकर,चंद्रकांत राजूरकर,बाळु विरुटकर, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.