गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथील तांबेश्वर कोडापे यांच्या घरा शेजारी असणाऱ्या तनसीच्या ढिगाराला दि.(१७) शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली.तनसीच्या ढिगाराजवळ मानवी वस्ती असल्याने गावात एकच तारांबळ उडाली.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.गावकऱ्यांनी तहसीलदार, ठाणेदारांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी तहसीलदार के डी मेश्राम,ठाणेदार जीवन राजगुरू दाखल होऊन तनसीच्या ढिगाराच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे वाहन बोलावून व गावकऱ्यांच्या सहकार्याने वेळेवर आग विजवत नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.मागच्या वर्षी याच गावात तीन घरांना भीषण आग लागली होती हे विशेष.गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथील तांबेश्वर कोडापे यांच्या घरा शेजारी असणाऱ्या तनसीच्या ढिगाराला दि.(१७) शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली.तनसीच्या ढिगाराजवळ मानवी वस्ती असल्याने गावात एकच तारांबळ उडाली.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.गावकऱ्यांनी तहसीलदार, ठाणेदारांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी तहसीलदार के डी मेश्राम,ठाणेदार जीवन राजगुरू,मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे,तलाठी कोलावार दाखल होऊन तनसीच्या ढिगाराच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे वाहन बोलावून व गावकऱ्यांच्या सहकार्याने वेळेवर आग विजवत नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.मागच्या वर्षी याच गावात तीन घरांना भीषण आग लागली होती हे विशेष.