उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
गोंडपिपरी-गोंडपिपरी तालुका अंतर्गत येत असलेल्या चकबापुर येथील महिला पोलिस पाटील भाग्यश्री मुत्येमवार यांचा गावातील मनमानी कारभार बघता त्यांना पदावरून पायउतार करण्याची मागणी संतोष मुगल वारग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. असे असताना देखील चकबापुर येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेली महिला भाग्यश्री मुत्येमवार यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याएवजी पक्षपात करीत वाद लावण्याची कामे करीत आहे. गावातील सार्वजनिक कामात नेहमीच अडथळा निर्माण करीत असतात. गावात कुठलेही कार्यक्रम आयोजीत केले असता नेहमीच अडथळा निर्माण करीत असतात. तर दुसरीकडे जवळील व्यक्तींनी कुठलेही बेकायदेशीर काम केले तरी मात्र त्यांना पाठीशी घातले जात आहे. एकंदरीत पक्षपात करीत असल्याचे स्पष्ट निदर्शनास येते. गावात प्रौढांचे कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते .मात्र याला देखील ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे या पोलीस पाटील यांनी टाळले. व चेकबापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील असलेला झेंडा सुरज मित्यमवार व अशोक रेचनकर आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जेसीबी द्वारे झेंडा तोडण्यात आला. याची तक्रार देतील तहसीलदार व उप पोलीस स्टेशन लाठी यांना देण्यात आले. मात्र सुरज मुत्येमवार हा या महिला पोलिस पाटलाचा मुलगा असल्याने सदर प्रकरण दाबण्यात आले आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.यामुळे या महीला पोलीस पाटील पदाचा दुरुपयोग करीत आहेत. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सदर महीला पदाचा गैरवापर करीत आहे. यामुळे संतप्त गावातील नागरिकांनी या महीला पोलीस पाटील यांना पदावरून पायउतार करावे, अशा मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.