अहेरी:- विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यात वार्षिक आमसभा होणार असून वार्षिक आमसभेतून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांनी दरवर्षी वार्षिक आमसभा घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतले आहे.मागील वर्षी मे महिन्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभेतील सिरोंचा, अहेरी, भामरागड, मुलचेरा आणि एटापल्ली या पाचही तालुक्यात वार्षिक आमसभा घेण्यात आले होते.यंदा फेब्रुवारी महिन्यात पाचही तालुक्यात वार्षिक आमसभा होणार असून राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातून याची सुरुवात होणार आहे.
सोमवार २० फेब्रुवारी रोजी सिरोंचा,मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी अहेरी,बुधवार २२ फेब्रुवारी रोजी भामरागड, गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी मुलचेरा आणि शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी एटापल्ली तालुक्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा होणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात वार्षिक आमसभेसाठी जय्यत तयारी केले जात आहे. आमसभेत गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांना आपापल्या समस्यावर थेट चर्चा करता येणार असल्याने या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहावे:आ.धर्मराव बाबा आत्राम
अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यात २० ते २४ फेब्रुवारी पर्यंत वार्षिक आमसभेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांचे विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्यांचे लेखी निवेदन घेऊन वार्षिक आमसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
-आ.धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र