वर्धा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताच्या साहित्य विक्री दिवस निमित्त जिल्हा केंद्र वर्धा येथील सोशलिस्ट चौकात साहित्य विक्री स्टॉल लावण्यात आले. या साहित्य विक्री केंद्राचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्जन व दीप प्रज्वलित करुन नगरातील प्रसिद्ध सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा व सामाजिक कार्यकर्ता तसेच आनंद मोबाईल प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा किरण सरोदय यांनी केले.
संघ साहित्य हे व्यावसायिक साहित्य नसून राष्ट्रीय साहित्य आहे,चरित्र निर्माणातुन राष्ट्र निर्माण प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचे साधन आहे माध्यम आहे असे मत किरण सरोदय यांनी व्यक्त केले. राजेंद्र भुतडा यांनी संघ साहित्य खरेदी करुन विक्री केंद्राला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख,जिल्हा कार्यवाह मुकुंद पिंपळगावकर,प्रचारक दिनदयाल कावरे,भारतीय विचार मंच चे प्रमुख प्राचार्य डॉ.धर्मेंद्र मुंधडा,डॉ.अश्विनी कुमार, मदन परसोडकर, निलेश बावनकुळे, हिरेन जानी,अनिल खीचरे,विनोद भारद्वाज आदि स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.