अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन शमले
गोंडपिपरी-तेलंगणासिमेवर गोंडपिपरी तालुका वसला आहे.या परिसरात आजही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभिर आहेत.अश्यातच चार दिवसांपासून पाणी पुरवठा विभागाचे बिल थकीत असल्या करणारे पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला नियमित कर भरून सुद्धा वारंवार पाणी वितरणाची समस्या लक्षात घेत शुक्रवारी सकमूर वासियांनी एकच हल्लाबोल केला.गावकऱ्यांनी यावेळी पाणी पुरवठा विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत विषयी रोष व्यक्त करत आंदोलन उभारले.त्यावेळी त्यांनी तब्बल ४ तास पोडसा-धाबा हा मार्ग अववून धरला.
गोंडपिपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सकमूर गावचा समावेश आहे.या परिसरात पाणी वितरणाची समस्या अधून-मधून डोके वर काढत असते.अश्यातच तेलंगणा सिमेवरील सकमूर गावात मागिल चार दिवसांपासून पाणी पुरवाठा बंद आहे.सोबतच हेटी नांदगावसह,गुजरी,चेकनंदगाव,कुडेनांदगाव,टोलेनांदगावात देखिल पाणीपुरवठा ठप्प आहे.सकमुरात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाही.परिणामी गढूळ पाण्याने तहान भागवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.यामूळे शुक्रवारी गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.आणि तेलंगणा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक गावकऱ्यांनी तब्बल चार-पाच तास अडवून संताप व्यक्त केला.अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भडारी,अधिकारी,संवर्ग विकास अधिकारी शालिक मावलीकर,नायब तहसीलदार शेम्बाडे, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांनी आंदोलकांना भेट दिली.माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली तात्काळ दखल घेत मुनगंटीवारांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दोन लाख रु भरून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश दिले.यावेळी संतोष मुगलवार ग्रा.प.सदस्य सकमुर,गौरव घुबडे युवासेना तालुका उपप्रमुख गोंडपिपरी,अखिल मानकर,सिकंदर गिणघरे,नेहरू गोंगले,संजय तेलजिलवार,नितेश कोटावार,महेश घुबडे, यशवंत शेरके,मारोती अलोने,प्रकाश कातकर,शुभम खर्डीवार,कालिदास शेरके,अविनाश घुबडे व शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता