भद्रावती : तालुक्यातील चालबर्डी (रै) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांनी केले आहे. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा, पर्यावरण, जल साक्षरता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायत चे पुरूषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, सौ. नंदिनी चुनारकर, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रकाश तितरे यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
प्रास्ताविक करतांना प्रा.डॉ. उत्तम घोसरे यांनी ग्राहक पंचायतचे कार्य आणि पर्यावरण, जल साक्षरता याविषयी माहिती दिली. ग्राहक पंचायत, भद्रावतीचे सहसचिव यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ यातील फरक, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये समाविष्ठ करण्यात आलेले घटक याबद्दल माहिती दिली. फवसी जाहीरात, ऑनलाईन होणारी फसवणूक, कायद्यात तरतुदी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
ग्राहक पंचातच्या सौ. नंदिनी चुनारकर यांनी ग्राहक म्हणजे काय, ग्राहकांची फसवणूक कशी होते, ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायत चे कार्य याविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. तर ग्राहक पंचायत, भद्रावती चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी ग्राहकांची फसवणूक झालीच तर त्या बद्दल ची प्राथमिक माहिती, तक्रार कोणकोणत्या विभागाला करावी हे सांगितले. ग्राहक पंचायत चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम मत्ते यांनी पर्यावरण विषयक माहीती देतांना जास्तीत जास्त झाडे लावावी, पाणी अडवने, पाणी जिरवने याबद्दल बोलले. तर मत्ते यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना विनंती केली की, कोणीही ऑनलाईन वस्तू विकत न घेता आपल्या गावातील, शहरातील दुकानदार व्यावसायिकांकडून घ्यावी अशी विनंती केली. वसंत वर्हाटे यांनी ग्राहक चळवळ, पंचायतची स्थापणा, ग्राहक संरक्षण कायदा कधी आणि कसा अमलात आला याची माहीती दिली. तर अशोक शेंडे यांनी ऑनलाईन वस्तू कुरियरने आल्यावर वस्तू उघडतांना त्याचा मोबाईल मध्ये विडिओ बनवावा, बिल सांभाळून ठेवावे. याविषयी माहिती दिली.
विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रकाश तितरे यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरण, जल साक्षरता याविषयी महत्वाची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली. पाण्याचे महत्व, पाण्याचा वापर, भविष्यात संपुर्ण जगावर पाण्यामुळे उद्भवणारे संकट, सध्या पिण्याच्या पाण्याचा उपलब्ध साठा, पृथ्वीवर सध्या उपलब्ध असणाऱ्या पाण्याची टक्केवारी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी संचालन व आभारप्रदर्शन जय ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पारेलवार, संचालक शारीरिक शिक्षण विभाग संगिता बोबडे, शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला.