अहेरी:- राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या कराटे पटूंना सरावासाठी उत्तम असा किट नसल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोलीचे अध्यक्ष शाहीन हकीम यांनी किटची मदत केली.
अहेरी तालुक्यातील महेक सय्यद आणि बंटी तुलावी यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र, या स्पर्धेच्या तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम असे कीट नव्हते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली होती.
याची माहिती मिळताच शाहीन हकीम यांनी महेक सय्यद आणि बंटी तुलावी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेत त्यांना पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रतिस्पर्धीसमोर टिकता यावे आणि अहेरी सारख्या आदिवासी बहुलभागातील क्रीडापटूंच्या कौशल्याला वाव मिळावं या उदात्त हेतून त्यांनी किटसाठी आर्थिक मदत केली.
शाहीन हकीम आणि बबलू हकीम हे नेहमीच रुग्ण,गरजू नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि निराधार लोकांना आर्थिक मदत करत असतात. पुन्हा एकदा त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या कराटेपटूंना मदत करून त्यांची परंपरा जोपासली आहे आणि यापुढेही आपल्या भागातील गरजू, होतकरू विद्यार्थी असो क्रीडा स्पर्धेत निवड झालेले खेळाडू असतील अशा लोकांसाठी 24 तास आपले दार खुले असल्याचे त्यांनी सांगितले.