भामरागड ता:– लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा व रोटरी क्लब ऑफ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने लोकबिरादरी हॉस्पिटल,हेमलकसा येथे १३ व १४ जानेवारी २०२३ला १७० नेत्ररुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या प्रेरणेने व डॉ.दिगंत आमटे व डॉ.अनघा आमटे यांच्या पुढाकाराने दरवर्षी लोकबिरादरी हॉस्पिटल हेमलकसा येथे विविध आजारांवरील शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण तसेच नजीकच्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील रुग्ण दरवर्षी शस्त्रक्रिया व उपचारांचा फायदा घेतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रोटरी क्लब ऑफ नागपूर व लोकबिरादरी हॉस्पिटल हेमलकसा यांचे संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरातील १७०नेत्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले.नागपूर येथील सर्जन डॉ.रफत खान, डॉ.लांबा, डॉ.समीर, डॉ.पलक,ऑप्टोमेट्रीस्ट राकेश चांदेकर, ठकसेन आंबीकर,पंकज शिंगोटे, जगदीश बुरडकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजनासाठी शारदा भसारकर, प्रियांका मोगरकर,दिपमाला लाटकर,शारदा ओक्सा, अरविंद मडावी,दिपक सुतार,संगिता विडपी, प्रियांका महाका,रणजिता गावडे, पप्पू मट्टामी,सुरेखा,अंजली, प्रकाश मायकरकार,जानकी लेखामी, गणेश हिवरकर इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.