नागपूर ( अजय तायवाडे) :- मानसिक,शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक या प्रत्येक प्रकारे निरोगी राहण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की,जेथे जेथे स्वच्छता असते तेथेच लक्ष्मी निवास करते असे प्रतिपादन यावेळी सरपंच सचिन इंगळे यांनी स्वछेतेचे महत्त्व सांगताना व्यक्त केले.
नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोटाळ पांजरी परिसरातील ग्रीनसीटी सोसायटीत नवीन वर्षानिमित्त परिसर स्वच्छता अभियानाला सुरुवात करून परिसरातील कचरा व अनावश्यक डिसपोजल वस्तू,प्लास्टिक पिशव्या आदी उचलून धार्मिक स्थळे,शाळा,मोकळे मैदान व गांवातील इतर परिसर स्वच्छ करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची देखभाल व संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला.
सरपंच सचिन इंगळे उपसरपंच आकाश पिसार,ग्रीन सोसायटीचे अध्यक्ष मुकुंद भट,सचिव पुनीत भगत,परीक्षित रूमाले, प्रेम रापरतीवर,दत्तात्रय जाधव,नितेश ठमके,नरेंद्र कावळे,मिनेश महल्ले,किशोर डाखोळे, ज्योती नागपुरे,रामदास खवशी,प्रशांत रामटेककर, योगेश पाटील,राजेंद्रसिंग राणे,चंद्रशेखर आंचरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोभाजी सावंत, श्रीराम धुर्वे,खुशाल राऊत,निलेश चिटगोपीकर, जया शर्मा,संगीता दाबेराव,अविनाश शिंदे,प्रणय गोंडाने, रिंकू उडाण,रीना सावंत, अतुल ढगे, तुळशीराम हेडाऊ, सचिन उपासे, अमोल घतारे, गणेश गजरे,दिशा लोही, मेघ गायकी,रश्मी निनावे यांनी सहकार्य केले.