गडचिरोली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भामरागड तालुक्यातील उपकेंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा- पल्ली, कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा व पंचायत समिती भामरागड येथे अचानक भेट देऊन आरोग्य विभाग, अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायत मार्फत राबिविल्या जाणाऱ्या विविध कामाचा आढावा घेतला व प्रत्यक्षात पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान ते राज्य सीमेवर वसलेल्या अति-दुर्गम अशा कसनसूर गावाला दुचाकी वाहनाने जाऊन भेट दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या काही काळात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास विभात अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्य सेवा बळकट करणे, माता-बालमृत्यू कमी करणे, आनंददायी शिक्षण प्रणाली अमलात आणणे, व बालकाचे कुपोषण दूर करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मावा-गडचिरोली पालवी, फुलोरा, विशेष आहार योजना आदी उपक्रम जिल्ह्यात विविध विभागा मार्फत राबिविले आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमांची कार्यक्षेत्रात प्रत्याक्षात अंमलबजावणी व तेथील समस्या व मार्गदर्शन करणेस्तव भामरागड तालुक्यातील अति-दुर्गम पल्ली, कसनसूर, आरेवाडा आदी ठिकाणी भेट दिली. भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दुचाकीचा ५ किलोमीटर प्रवास करून कसनसूर गावातील सुरु असलेल्या लसीकरण सत्राला भेट दिली. उपस्थितीत आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी कार्यकर्ती यांचा कामाचा आढावा घेतला व लाभार्थींच्या घरी भेट देऊन पालवी उपक्रम, विशेष गोवर लसीकरण मोहीम, हिवताप मोहीम व कुपोषण बाबत जनतेशी चर्चा केली. गावात घरी प्रसूती, मलेरिया चे प्रमाण जास्त असून आरोग्य विभाग, पंचायत विभाग व ग्रामपंचायत यांनी संयुक्तिक काम करण्याचे निर्देश दिले. त्याचा बरोबर उपकेंद्र-पल्ली व जिल्हा परिषद,ग्रामपंचायत पल्लीला भेट दिली. सर्व जोखमीच्या गरोदर माता यांना सर्वकष सेवा देणे. तसेच जिल्हा परिषद शाळा येथील फुलोरा उपक्रम बाबत माहिती जाणून घेतली, तेथील बालकांनी फुरोला अंतर्गत सादर केलेलं विविध कौशल्य बघून समाधान व्यक्त केले. गावकऱ्यांशी चर्चा करून विकास कामाचा आढावा व समस्या जाऊन घेतले.
प्रा.आ.केंद-आरेवाडा ला भेट देऊन विविध आरोग्य विषयक कामाचा आढावा घेतला व आरोग्य सेवा बळकट करणे बाबत आदेश दिले.त्याचा बरोबर पंचायत समिती-भामरागड भेट दिली. श्री.स्वपील मगदूम संवर्ग विकास अधिकारी यांचे कडून तालुक्यातील विविध विकासाच्या कामाचा आढावा घेतला. सदर दौऱ्या दरम्यान डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी,आरोग्य विभाग सोबत होते.