मुलचेरा:-नियमित सराव व योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातूनही दर्जेदार व गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी व्यक्त केला.मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे नुकतेच रबरी बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी माजी जि प सदस्य ऋषी पोरतेट,सामाजिक कार्यकर्ते अमित मुजुमदार, लगामचे सरपंच दीपक मडावी,येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे,शांतिग्राम ग्रामपंचायतचे सदस्य सपन डे, माजी सरपंच सुशील खराती,ग्रा प सदस्य ललिता कोडापे, नरेश राऊत,विकास मंडल,रामदास टेकुलवार,मलय्या पानेमवार,शंकर पानेमवार,संतोष हजारे,पोलीस पाटील शंकर शेडमाके,अशोक आत्राम,शुभम कुत्तरमारे,नागेश मडावी,आशुतोष पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ग्रामीण भागातील युवा खेळाडू मध्ये अनेक सुप्त गुण आहेत.मात्र,ते बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या आवडीनुसार त्यांना त्या-त्या क्षेत्रात संधी देण्याची गरज आहे.शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध खेळ खेळलेच पाहिजे.मात्र,ज्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याच क्षेत्रात जास्त लक्ष दिले पाहिजे.असाही महत्वाचा संदेश यावेळी त्यांनी दिला.
आयोजित रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेत परिसरातील चमुनीं मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला असून या स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पारितोषिक आणि शिल्ड देण्यात आले.