गोंडपिपरी-राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही.योजनेच्या लाभासाठी मोर्चे व संप पुकारून कर्मचाऱ्यांनी आंदोलने देखील केली.मात्र अद्यापही महसुल कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही.यामुळे आता राज्यातील महसुल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांचा नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मागणी निकाली काढण्यासाठी आज दि (दि.२७) रोजी विधानभवनावर मोर्चा धडकणार असल्याची माहिती प्रकाश सुर्वे यांनी दिली.
राजस्थान,छत्तीसगड,पंजाब व झारखंड आदी राज्यात १ जाने २००४ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांना पेंशन योजनेत सहभागी करून घेतले.त्यातच या राज्यात महसुलच्या कर्मचाऱ्यांना पेंशन देण्यात येते.मात्र महाराष्ट्र राज्यात अजूनपर्यंत ही योजना लागू केली नाही.त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर येथील महसूल कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगणे कठीण आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह पेन्शन योजनेअभावी कसा चालविता येणार,हा प्रश्नच आहे.अशावेळी आतापर्यंत जुन्या पेन्शन योजना लागु करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदन देण्यात आली.सोबतच मोर्चे,आंदोलन व संप देखील करण्यात आला.मात्र दखल घेतल्या गेली नाही.त्याचवेळी जुनी पेन्शन योजना शासनाने लागु करावी ही मागणी कर्मचाऱ्यांनी ठासून धरली असून आता नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महसुलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांचा धडक मोर्चा आज (दि.२७) रोजी विधानभवनावर धडकणार आहे.सदर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे,उपाध्यक्ष प्रकाश सुर्वे,सरचिटणीस संजय आव्हणे यांनी केले आहे.