घुग्गुस:- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन-की-बात कार्यक्रमाचे सामूहिक दृकश्रवण देखील याठिकाणी पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना, लोकनेते असा नावलौकिक असलेले श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व निस्पृह देशसेवा आजही भाजपा कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचे कार्य करते.
श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी निष्णात राजकारणी, निस्पृह राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्रद्धेय अटलजींनी पूर्ण केल्या. त्यामुळे आजचा दिवस संपूर्ण देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येते यानिमित्तानं आज सेवा केंद्राच्या माध्यमातूनही केंद्र सरकारच्या गोरगरीब जनतेसह शेतकर्यांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान देखील याठिकाणी होत आहे. श्रद्धेय अटलजींना माझे पुनःच्छा शत शत नमन! असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आगरे, नितीन काळे, गणेश बोबडे, रज्जाक शेख, वमसी महाकाली, सुरेश जोगी, संतोषसिंग चंदेल, प्रभाकर डांगे, राकेश याटावर, रविकांत नांदे, सुनील मासिरकर, गजानन पारखी, चंदू मारोतराव थिपे, महेश गादयवार, मोरेश्वर उलमाले, रवींद्र मांढरे, मारुती खोब्रागडे, तरुण रायपुरे, स्वप्निल दुर्गे, महेश करमणकर, राजु भरणे, सुधाकर हजारे, विलास भगत, विनोद राजूरकर, सतीश गायकवाड, सुरज रासपल्ले, श्रेयश लक्कावार, महेंद्र जेनेकर, आकाश सोनटक्के, निखिलेश माझी, अनिकेत कविटकर, राहुल बोबडे, दीपक कांबळे, रोहित गोरे,राजु चौधरी, अवि नियाल, नरेश भोयर, सौ. वंदना जुनघरे, उत्तम आंमडे, ममता गौरकार, गुलाब पोडे,संजय तिवारी, अमोल थेरे,प्रवीण सोदारी, श्रीकांत बहादुर, मानस सिंग, अमोल तुलसे, चंद्रभान विरुरकर, अभिजीत सिंग बैस, तरुण रायपुरे आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.