भद्रावती:- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे , त्यात आधुनिक संत म्हणून जगप्रख्यात असणारे श्रध्येय बाबा आमटे हे सांगून गेले मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे . त्याच मतावर स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कार्य करत असून श्रध्येय बाबा आमटे आरोग्य अभियान , निराधार बालकांना दत्तक योजना , शेतकऱ्यांना आर्थिक मदत , अपंगांना सायकल वाटप असे विविध उपक्रम संस्थे मार्फत राबविले जातात. यात कुठलाही राजकीय हेतू नसून ज्या प्रमाने आम्ही गरजूंना मदत करत आहोत त्याच प्रमाणे आपण ही गरजूना सहाय्क करावे असे मत व्यक्त करून उपस्थितांना संकल्प घेण्याचे आवाहन रवींद्र शिंदे यांनी केले .
ते श्री संत झिंगूजी महाराज ८३ व्य पुण्यतिथी महोत्सव २०२२ निनित्य आयोजित स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित` स्वरानंदवन ` आनंदवन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करतांना बोलत होते . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे , प्रमुख अतिथी म्हणून, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर , ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष प्रा .धनराज आस्वले , महारोगी सेवा समिती वरोरा चे विश्वस्त सदाशिव ताजने , नगरसेवक नंदू पढाल, नरसेविका शीतल गेडाम , भद्रावती प्रेस क्लब चे अध्यक्ष डॉ . यशवंत घुमे, भद्रावती पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते .
आपल्या भाषणात ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष प्रा .आस्वले यांनी संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला . त्याचं सोबत गरजूंच्या मदती करिता आम्ही सदैव तत्पर असून आपल्या आजूबाजूला गरजू व्यक्ती दिसल्यास आम्हाला संपर्क करा आम्हीं त्याला मदत करू असे आश्वासन ही त्यांनी या वेळी दिले .कार्यक्रमाच्या सुरवातीला रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धाकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप नागपुरे , तर आभार मनोहर नागपुरे यांनी मानले .