प्रहार सेवक प्रवीण वाघे आक्रमक
चिमूर ( चंद्रपूर ):- तालुक्यातील नेरी हे सर्वात मोठे गाव असून येथे बँक आफ इंडीया ची एकच राष्ट्रीयकृत बँक असून या बँकेला हजारोंच्या संख्येने खातेदार आहेत. त्यामूळे दैनंदिन व्यवहार करताना बँकेत मोठी गर्दी उसळत असते .यामध्ये रांगेत ग्राहक बँकेत प्रवेश करतात परंतु प्रवेश दाराजवळील कर्मचारी हा ग्राहकांना नाहक त्रास देत असून असभ्य बोलून ग्राहकांची मानहानी करतो तेव्हा या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रहरसेवक प्रवीण वाघे यांनी केली आहे.
नेरी हे लोकसंख्या असलेले तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे एकच राष्ट्रीयीकृत बँक असून नेरी व परिसरातील अनेक गावातील ग्राहकांचे खाते या बँकेत आहेत. त्यामुळे दररोज या बँकेच्या शाखेत गर्दी उसळते ग्राहक व्यवहार करण्यासाठी रांगेत तासनतास उभे राहू आपला व्यवहार करतात. परंतु बँकेच्या प्रवेशद्वारावर एक कर्मचारी हा स्वतः अरेरावी करतो आणि असभ्य वागणूक करतो मोठमोठ्या व्यापारी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन नंबर नसेल तरी त्यांना जाऊ देतो आणि गोरगरीब सामान्य माणसांना बऱ्याच वेळ ताटकळत उभे ठेऊन त्यांच्याशी असभ्य वागूनक देऊन त्यांची मानहानी करतो. हा प्रकार निंदनीय असून अनेक ग्राहकांनी या कर्मचाऱ्यांची तक्रार बँक अधिकारी वर्गाकडे केली तरी पण याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाहीत .त्यामुळे या कर्मचाऱ्यांविरुद्ध जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे .हा कर्मचारी कोरोनाचे नियम सांगताना प्रत्येक ग्राहकाला मास्क लावायला सांगतो जनसामान्य नागरिकांना मास्क लावल्याशिवाय आत प्रवेश देत नाही आणि प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मोठी माणसे याना विना मास्क आत प्रवेश देतो. तेव्हा कोरोनाचे नियम हे फक्त गरीब जनसामान्य माणसासाठी आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. असा आरोप प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी उपस्थित केला असून सदर कर्मचाऱ्यांच्या या वर्तुणुकीवर बँक व्यवस्थापकाचे सुद्धा नियंत्रण नसून सर्व प्रकार माहीत असूनही ते याकडे काणाडोळा करत असल्याचा आरोप ही वाघे यांनी केला आहे . तेव्हा अश्या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी व प्रवीण वाघे यांनी केली आहे. तेव्हा संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.