गोंडपिपरी – (सुरज माडूरवार) :- विधानसभा निवडणुकीचा सध्या धुमाकूळ सुरू आहे.प्रचार शासकीय बैठका,नाकाबंदी,बूथ आढावा अशा अनेक कामात अधिकारी,कर्मचारी व्यस्त आहे.निवडणुकीची संधी साधून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत आहे.
अशातच दि (७) गुरूवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारावर गोंडपिपरी वढोली मार्गावर खराळपेठ येथे नाकाबंदी केली असता एका महिंद्रा ट्रॅक्टर मधुन अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करीत असताना आढळून आले.घटनस्थळी चौकशी करून चालकास ताब्यात घेत ट्रॅक्टर एम एच 34 सी जे 3095 व रेती असा एकूण ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चालक निकेश मडावी वय (२७) व मालक मंगेश लखमापूरे वय (३७) दोघेही रा. तारडा,ता.गोंडपिंपरी यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला आहे.सदर कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पोहवा कृष्णा रॉय,पोलीस अमलदार अनुप निकोरे यांनी केली आहे.
लिखितवाडा घाटावर प्रशासन मेहेरबान….
तालुक्यातील लिखितवाडा घाटावर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तेथील पोलीस पाटील यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन या वॉट्सप ग्रुप वर अधिकृत माहिती टाकली.तहसीलदार शुभम बहाकर यांनी दखल घेऊन तलाठी व अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.मात्र अजूनही लिखितवाडा घाटावर रेती तस्करी जोमात सुरू असून कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.