मुलचेरा:- ग्रामीण भागात अनेक दर्जेदार खेळाडू दडलेले आहेत. मात्र, त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज आहे. कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल आदी मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करून नियमित सराव केल्यास ग्रामीण भागातही उत्तम खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.
तालुक्यातील शांतीग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शांतिग्राम चे ग्रा प सदस्य तथा जेष्ठ नागरिक आदित्य घरामी,ग्रा प सदस्य सपन डे, ग्रा प सदस्य अमित मुजुमदार,लगाम चे सरपंच दीपक मडावी,येल्ला चे उपसरपंच दिवाकर उराडे,माजी ग्रा प सदस्य सुशील खराती,विकास घरामी,गोविंद भाऊ,विकास मंडल,निर्मल मंडल,जेष्ठ नागरिक नारायण डे,अनुप बेपारी,प्रणव मंडल, देबू मंडल, गौतम मित्र,शुभम कुत्तरमारे,आशुतोष पिपरे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना खेळाडू घडण्यासाठी प्रशिक्षकांची गरज असते, जे जीवाचे रान करून मैदानावर खेळाडू घडवतात. मात्र,जिल्ह्यात योग्य प्रशिक्षक नसतानाही युवकांची खेळाविषयी तळमळ आहे ही आनंदाची बाब आहे. भविष्यात कुठलेही स्पर्धा घ्यायचे असल्यास युवा पिढीसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी शांतीग्राम येथे आगमन होताच माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांचा गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.या स्पर्धेत तालुक्यातील विविध गावातील चमुंनी सहभाग घेतला.स्पर्धेच्या आयोजनासाठी गावातील युवापिढीने सहकार्य केले.