कोठारी-: १४ वर्षानंतर जेव्हा राज्यभरातील एका परिवारातील सदस्य त्यांच्या सुणा,जावई मुली ,मुल,आई वडील एकत्र येतात त्यावेळी झालेला आनंद व डोळ्यातून येणारे आनंदाश्रू खूप काही सांगून जातात असाच एक आगळा वेग ळा माडूरवार सनेहमिलन सोहळा २०२२ नुकताच कोठारी तोहगाव मार्गावरील बामणी काटोल येथील गोलेछा यांच्या अग्रो फॉर्म वर पार पडला.वसुदेव कुटुंबकम ही आपल्याला लाभलेली संस्कृती इतकंच नव्हे तर हे विश्वची माझे घर हे आपण नेहमी ऐकत असतो.मात्र हे सर्व ऐकत असताना वॉट्स ऍप,फेसबुक,टेलिग्राम,ट्विटर,इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमातून जगाशी संपर्क साधण्यामध्ये व्यस्त आहोत मात्र आपली मानस आपल्या पासून नकळत कधी दुरावतात हे आपल्याला कडत सुद्धा नाही.म्हणूनच नुकतच दिवाळीच्या तेजोमय असणाऱ्या वातावरणामध्ये स्नेह मिलन सोहळा २०२२ चे आयोजन माडुरवार परिवाराने केले राज्यभरातून सर्व कुटुंब एकत्र आली.माडुरवार परिवाराने उद्योग, नौकरी,सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उतुंग भरारी गरुढझेप आहे. सर्वांचे समंध अधिक दृढ व्हावे संपर्कात राहता यावे करीता स्मरनिका प्रकाशन,परिचय,मनोरंजन,स्नेहभोजन,विचारांची देवाण घेवाण नवीन पिढी आदर्श घेणारा करणारा कार्यक्रम यशस्वी पार पडला स्नेहमीलन सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी २५० सदस्य एकत्र आली होती.सोहळ्याच्या यशस्वितेसाठी डॉ अनिल माडूरवार,मंगेश माडूरवार,सुरज माडूरवार,सुहास माडूरवार,विलास माडुरवार,नंदकिशोर माडूरवार,अजय माडूरवार,नीलिमा माडुरवार,मीनल माडुरवार,गौरव माडुरवार,राकेश माडुरवार,करुणा बोगावार ,दीपक माडुरवार यांनी अथक परिश्रम घेतले