मुलचेरा:- ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे.ते प्रत्येक खेळात अव्वल येतील ही क्षमता ठेवतात.मात्र, त्यांना हव्या त्या सुविधा आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक खेळासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी व्यक्त केले.
मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.यावेळी शांतिग्राम ग्रा प सदस्य जोदुलाल घरामी, ग्रा प सदस्य अमित मुजुमदार,येल्लाचे उप सरपंच दिवाकर उराडे, ग्रा प सदस्य सुशील खराती,नागेश मडावी,शुभम कुत्तरमारे तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुलचेरा तालुक्यात केवळ क्रिकेटच नव्हेतर फुटबॉल स्पर्धेचेही आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.सध्या सगळीकडे क्रिकेटचा क्रेझ असला तरी मुलचेरा तालुक्यात सर्वच खेळांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. शिक्षणासोबतच खेळालाही विशेष महत्त्व असून युवकांनी सर्वच मैदानी खेळात मध्ये सहभाग घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी गावात प्रवेश होताच गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.उदघाटनाच्या वेळी त्यांनी स्वतः बॅट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी केली व उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढविला.