गोंडपिपरी : गोंडपिपरीतील अंतर्गत सिमेंट रस्ते असताना शिवाजी चौक ते संविधान चौक या मार्गाची अतिशय दयनीय होती. या मार्गावर अनेक अपघात झाले. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. दरम्यान, काँग्रेसचे नेते राकेश पून यांनी याठिकाणी पक्क्या रस्त्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. शिवाजी चौक ते संविधान चौक मार्गाला सिमेंट काँक्रीट रोडसोबत भूमिगत नाल्याचा कामाला मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे.
चिंतलधाबा ते गोंडपिपरी या प्रमुख मार्गाचे काम सुरू आहे. गोंडपिपरीच्या हनुमान मंदिर परिसरापासून जुन्या बसस्थानकापर्यंत हा मार्ग होणार होता. पण अरूंद जागा, शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी आवक जावक लक्षात घेता या मार्गाला संविधान चौकापासून शिवाजी चौकापर्यत वळविण्याची मागणी काँग्रेसचे राकेश पून यांनी केली. त्यांनी आमदार सुभाष धोटे यांना प्रत्यक्षपणे परिस्थिती निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर आता या मार्गावरील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या मार्गासोबत भूमिगत नाल्याही होणार आहे. हा मार्ग बायपास असल्याने नगरातील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सूटू शकते. सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबत राकेश पून यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.