चंद्रपूर:- चंद्रपूर चे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे होते अजय गुल्हाने यांची बदली होऊन विनय गोंडा यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रहार सेवकांनी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत वनपट्टे धारक जामणी, नवेगावं, बोटेझरी व चंदई नाला प्रकल्प निमढेला पुनर्वसन ,पाटाळा घुग्गुस गावातील प्रलंबीत प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या कडे मांडले या पमागण्यांना घेऊन लवकरच बैठक बोलावून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू असे आस्वासन नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या वेळी प्रहार सेवक शेरखान पठाण, तुलसी रामटेके, रुपेश धारणे, सोमाजी नन्नावरे, विनोद खीरटकर, संपत उराडे, संजय डुकरे हे उपस्तिथ होते.