वरोरा:- आनंदवन येथील आनंद अंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूयात असा संदेश देत छोटेखाणी कार्यक्रम घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
“फटाके’ फोडण्यातून मिळणारा आनंद जीवघेणा आहे. फटाक्यांमुळे क्षणिक आनंद मिळत असला तरी त्याचे परिणाम वर्षानुवर्षे भोगावे लागतात. फटाक्यांमुळे प्रदूषण नव्हे तर मनुष्य आणि प्राण्यांनाही धोका संभवत़ो. दिवाळीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर फटाक्यांचा मोह टाळलाच पाहिजे. असे आवाहन कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी केले. आनंद अंध विद्यालय आनंदवन मध्ये ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ यासंबंधी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी अंध शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर त्यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामावर सविस्तर मार्गदर्शन केले. दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ अंध विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना देण्यात आली. “फटाके मुक्त दिवाळी साजरी करू या, प्रदुषणाला आळा घालू या” असे ब्रीद वाक्य प्रत्येकांनी आपापल्या घरांवर लावून या अभियानाला गावागावातून प्रचार आणि प्रसार करावा पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करून या सणाचा आनंद लुटावा असा एकच सुर अंध मुलांनी काढून जल्लोष केलाय. यावेळी शाळेचे विभाग प्रमुख कृष्णा डोंगरवार, जेष्ठ शिक्षिका साधना माटे, तनुजा सव्वाशेरे, वर्षा उईके, विलास कावणपुरे, राकेश आत्राम इत्यादी शिक्षक मंडळींनी “सण दिवाळी वर्षाचा, आम्ही साजरा करणार, प्रदूषण करणारे ; नाही फटाके फोडणार अशी सामुहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.