गडचिरोली-अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गड़चिरोली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचालित लक्ष्य स्पर्धा मार्गदर्शन केंद, अहेरी द्वारा खुली सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वर्ग 8 पासून तर पदवीचे शिक्षण सुरु असलेल आणि पदवी झालेले विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली.सदर परीक्षा आलापल्ली आणि अहेरी येथिल राजे धर्मराव हायस्कुल येथे घेण्यात आली.या परीक्षेला अहेरी केन्द्रात खुल्या गटातून 345 आणि 8 ते 10 वर्ग गटातुन 77 शालेय विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.तर, आलापल्ली केन्द्रात खुला गटात 65 आणि 8 ते 10 वर्ग गटाचे 165 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेला एकुन 623 विद्याथ्यार्नी उपस्थिती दर्शवली.
सदर स्पर्धा परीक्षेसाठी अनुक्रमे तीन पारितोषिक ठेवन्यात आले होते.सदर परीक्षेसाठी राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी संस्थाचे पदाधिकारी शिक्षक गिरीश मद्देर्लावार, तसेच लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक विनोद दहागांवकर,सतीश पानगंटीवार सह सर्व मार्गदर्शक व अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.सदर परीक्षेला प्राचार्य मंडल सर,प्राचार्य कोडेलवार सर,प्राचार्य भोंगड़े सह शिक्षक प्रवीण बुरान ,युवराज करडे आतिश दोन्तूलवार,शिवप्रसाद दोन्तूलवार या शिक्षकांनी सहकार्य केले.